about image

करंजामाता सहकारी पतसंस्थेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.

"सुरक्षित सेवा, विश्वासार्ह कर्ज आणि सामूहिक आर्थिक प्रगती"
करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित ही ग्रामदैवत करंजामातेच्या नावाने २५ जानेवारी १९९६ रोजी स्थापन झालेली विश्वासार्ह सहकारी संस्था आहे. करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित ही गेल्या एकोणतीस वर्षांपासून समाजाच्या तळागाळातील कमकुवत आणि उपेक्षित घटकांना कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहे. महिला बचत गटांना एकत्र करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी माफक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शहरात राहणारा आणि गावाशी नाते जोडलेला तडफदार संचालक मंडळ सक्रिय कार्यरत आहे. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कामांसाठी उपविधीच्या अधीन राहून शक्य तेवढे आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
अधिक वाचा..

“सभासदांचा विश्वास – आमची खरी ताकद”

सभासद, ठेवी, कर्ज आणि शाखांमधून घडलेली प्रगती

२१०८
एकूण सभासद
७ कोटी
एकूण ठेवी
५ कोटी
एकूण गुंतवणूक

आमच्या सेवा

सभासदांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी समर्पित सेवा, परवडणारी कर्जे, सुरक्षित बचत योजना, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सहकारी व्यवस्थापन.

ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच अपंग व्यक्तींना करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित कडून ठेवींवर अर्धा टक्का (०.५०%) अधिक व्याजदर देण्यात येऊन सुरक्षित व सन्मानजनक आर्थिक आधार दिला जातो.

इतर सेवा पहा..