आमच्याबद्दल
आपल्या विश्वासाची संस्था, आपल्या आर्थिक प्रगतीचा आधार.
करंजामाता सहकारी पतसंस्थेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.
"एक संघराज्य, अनेक संधी"करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित ही ग्रामदैवत करंजामातेच्या नावाने २५ जानेवारी १९९६ रोजी स्थापन झालेली विश्वासार्ह सहकारी संस्था आहे. करंजामाता सहकारी पतसंस्था मर्यादित ही गेल्या एकोणतीस वर्षांपासून समाजाच्या तळागाळातील कमकुवत आणि उपेक्षित घटकांना कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहे. महिला बचत गटांना एकत्र करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी माफक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शहरात राहणारा आणि गावाशी नाते जोडलेला तडफदार संचालक मंडळ सक्रिय कार्यरत आहे. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक कामांसाठी उपविधीच्या अधीन राहून शक्य तेवढे आर्थिक सहाय्य पुरवले जाते.
दिनांक १०/०५/२०२४ पासून ओतूर, तालुका जुन्नर, जि. पुणे येथे शाखा कार्यरत असून गावाकडील गरजू सभासदांना संस्थेच्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा केला जात आहे. मुख्य शाखेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहकार्याने वीज बिल भरणा केंद्र क्रमांक १२ उपलब्ध आहे.
ठेवींवर ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंगांना अर्धा टक्का अधिक व्याजदर दिला जातो. सभासदांना सतत १२% दराने लाभांश मिळतो. सर्व सभासदांसाठी सोने तारण कर्ज सुविधा मुख्य शाखा आणि ओतूर शाखा येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये :
विनम्र, पारदर्शक आणि सुलभ सेवा : सभासदांना विनम्र, पारदर्शक आणि सहज समजणारी आर्थिक सेवा देण्यावर संस्था विशेष भर देते.
सतत ऑडिट वर्ग “अ” प्राप्त संस्था : संस्थेने सातत्याने ऑडिट वर्ग “अ” प्राप्त करून आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
संपूर्ण संगणकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : संपूर्ण संगणकीकरणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यवहार जलद, सुरक्षित व पारदर्शक केले आहेत.
एस.एम.एस. द्वारे खाते व व्यवहार माहितीची सुविधा : सभासदांना एस.एम.एस. सुविधेद्वारे खात्याची व व्यवहारांची तत्काळ आणि अचूक माहिती दिली जाते.
प्रशिक्षित, अनुभवी व कार्यक्षम संचालक मंडळ, कर्मचारी व सभासद वर्ग : प्रशिक्षित व अनुभवी संचालक मंडळ, कर्मचारी आणि जागरूक सभासद संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत.
संस्थेच्या वाढीसाठी सभासद, कर्जदार सभासद, ठेवीदार व हितचिंतकांचा सक्रिय सहभाग : संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सभासद, कर्जदार, ठेवीदार आणि हितचिंतकांचा सक्रिय सहभाग असतो.
“सभासदांचा विश्वास – आमची खरी ताकद”
सभासद, ठेवी, कर्ज आणि शाखांमधून घडलेली प्रगती
एकूण सभासद
एकूण ठेवी
एकूण गुंतवणूक
“बचतीत सुरक्षितता, कर्जात सुलभता”
आकड्यांतून सिद्ध झालेली आर्थिक विश्वासार्हता
एकूण उलाढाल
एकूण कर्ज
एकूण शाखा
संचालक मंडळ
नवनिर्वाचित संचालक मंडळ
श्री. शिवाजीराव महादेव ठिकेकर
संस्थापक / अध्यक्ष
श्री. सुरेश दामोदर ठिकेकर
उपाद्यक्ष
श्री. जितेंद्र श्रीकृष्ण काळे
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. विलास रोहिदास येंधे
संचालक
श्री. मच्छिंद्र लक्ष्मण औटी
संचालक
श्री. पांडुरंग लक्ष्मण ठिकेकर
संचालक
श्री. किसन गिरजु ठिकेकर
संचालक
श्री. शांताराम गंगाराम ठिकेकर
संचालक
श्री. उल्हास दत्तात्रय ठिकेकर
संचालक
सौ. उषा शिवाजी ठिकेकर
संचालिका
सौ. कल्पना दिलिप ठिकेकर
संचालिका
श्री. दत्तात्रय गेणभाऊ ठिकेकर
तज्ञ संचालक
श्री. निवृत्ती गणपत ठिकेकर
तज्ञ संचालक
शाखा व्यवस्थापन समिती
विश्वास, पारदर्शकता आणि जबाबदार व्यवस्थापन.
श्री. दिलीप सखाराम ठिकेकर
व्यवस्थापन समिती
श्री. संकेत प्रभाकर ठिकेकर
व्यवस्थापन समिती
श्री. मारुती विष्णू फापाळे
व्यवस्थापन समिती
श्री. लक्ष्मण रघुनाथ रोकडे
व्यवस्थापन समिती
श्री. शिवाजी रामदास ठिकेकर
व्यवस्थापन समिती
कर्मचारी सदस्य
विश्वासार्ह सेवा, अनुभवी कर्मचारी.
सौ. जयश्री मंगेश कालेकर
वरिष्ठ लिपिक
सौ. मंगल निलेश डुंबरे
लिपिक
सौ. काजल नितीन दाभाडे
लिपिक ( ओतूर शाखा )
श्री. कपिल विकास ठिकेकर
लिपिक ( ओतूर शाखा )